पती पाठोपाठ चार तासात पत्नीचाही मृत्यू ; कोगनोळी जवळील हणबरवाडीतील घटनेने परिसरात हळहळ

कोगनोळी :
कोगनोळी येथील प्राथमिक कृषी पत्तीन सेवा संघाचे माजी सेक्रेटरी पांडुरंग कल्लाप्पा मोरडे (वय 61) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. पतीच्या या निधनाने धक्का बसलेल्या त्यांच्या पत्नी आनंदी पांडुरंग मोरडे (वय 50) यांचेही अवघ्या चार तासांमध्ये निधन झाल्याने कोगनोळी हणबरवाडी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
पांडुरंग मोरडे हे मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होते. या आजारामुळे त्यांच्या पायाला झालेली जखम लवकर बरी होत नव्हती. हीच गोष्ट त्यांच्या पत्नी यांच्या जिव्हारी लागली होती. त्यातून त्यांच्याही प्रकृती अस्वस्थ्याच्या तक्रारी निर्माण होऊ लागल्या. त्यामध्ये पहाटे पाचच्या सुमारास पांडुरंग मोरडे यांचे निधन झाले. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या निधनाचा धसका घेतलेल्या त्यांच्या पत्नी आनंदी यांचेही अवघ्या चार तासात निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.