ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतींसाठी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) (कोल्हापूर) यांच्यावतीने जिल्हा उद्योग केंद्र (डी.आय.सी.) पुरस्कृत सर्वसाधारण व विशेष घटक योजना सन 2021-2022 अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींसाठी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इच्छुकांनी 28 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

करवीर तालुका-कोल्हापूर शहर येथे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता फुड अँड फ्रुट प्रोसेसिंग, सीएनसी व्हीएनसी ऑपरेटिंग, फिटर, इंडस्ट्रीयल ईलेक्ट्रीशियन, कॉम्प्युटर डीटीपी, कॉम्प्युटर टॅली विथ जीएसटी प्रशिक्षण कार्यक्रम.
विशेष प्रवर्गाकरिता (अनुसूचित जाती) सीएनसी-व्हीएनसी ऑपरेटिंग, वेल्डींग असिस्टंट, रेक्झीन व कापडी बॅग मेकिंग, इंडस्ट्रीयल अकौंटींग विथ जीएसटी, सी.सी.टी.व्ही. ईन्स्टॉलेशन व मेंटेनन्स, टर्नर, फाँड्री टेक्नालॉजी प्रशिक्षण कार्यक्रम.
राधानगरी तालुक्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाकरिता कॉम्प्युटर टॅली विथ जीएसटी

विशेष प्रवर्गा (अनुसूचित जाती) करिता कॉम्प्युटर हार्डवेअर व नेटवर्किंग प्रशिक्षण कार्यक्रम.

भुदरगड तालुक्यामध्ये सर्वसाधारण तसेच विशेष प्रवर्गा (अनुसूचित जाती) करिता कॉम्प्युटर टॅली विथ जीएसटी प्रशिक्षण कार्यक्रम.

आजरा तालुक्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाकरिता काजू प्रक्रिया
विशेष प्रवर्गा (अनुसूचित जाती) करिता कॉम्प्युटर हार्डवेअर व नेटवर्किंग प्रशिक्षण कार्यक्रम.

गडहिंगलज तालुक्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाकरिता हॉटेल मॅनेजमेंट कॅटरिंग टेक्नालॉजी,
विशेष प्रवर्ग (अनुसूचित जाती करिता) केटरिंग टेक्नालॉजी प्रशिक्षण कार्यक्रम तर

चंदगड येथे विशेष प्रवर्ग (अनुसूचित जाती) करिता कॉम्प्युटर टॅली विथ जीएसटी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सुशिक्षित बेरोजगारांना उद्योजकता विकास व तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करण्यास प्रवृत्त करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षणाशिवाय उद्योजकता विकास प्रशिक्षण ज्यामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग उभारणी व व्यवस्थापन, विविध कर्ज योजना व कर्ज प्रकरण तयार करणे, बँकेचे व्यवहार, प्रकल्प अहवाल तयार करणे. इ. विषयी तज्ञ व अधिकारी वर्गामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.

कार्यक्रम संपूर्णतः मोफत असून यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. निवड समितीमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीमधून प्रशिक्षणार्थींची कार्यक्रमासाठी निवड केली जाणार आहे. कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी सर्वसाधारण किमान 7 वी पास, किंवा पदवी / पदविका, वयोगट 18 ते 45 वर्ष तसेच जिल्ह्यातील रहिवासी असावा. त्याशिवाय कोणत्याही वित्त संस्थेचा थकबाकीदार नसावा.

आवश्यक कागदपत्रे- शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, स्वतःचे नावे असलेले बँक खाते पासबुकाची सत्यप्रत व दोन फोटो.

एम.सी.ई.डी. कार्यक्रम सहयोगी कोल्हापूर-करवीर तालुका धीरज कवळे- 9823433729, वंदना घाटगे -9552747629, संगीता चव्हाण – 8446167200, आनंदा शिंदे – 9421109484, राधानगरी तालुका राजेंद्र चव्हाण – 9423281767, भुदरगड तालुका संतोष सोकासने – 7588065442, आजरा तालुका श्रीकृष्ण खामकर – 9960194806, चंदगड तालुका संजय आगाशे -7378586804, गडहिंग्लज तालुका धनंजय घुले – 9146085001 किंवा प्रकल्प अधिकारी एम.सी.ई.डी कोल्हापूर द्वारा उद्योग भवन, महावीर गार्डन समोर, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजुला, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks