ताज्या बातम्या

कंथेवाडी, तारळे खुर्द परिसरातील वीज होतेय गायब; पिके वाळण्याच्या अवस्थेत

तरसंबळे प्रतिनिधी :

कसबा तारळे परिसरातील शेती तारळे खुर्द, कंथेवाडी विद्युत पंपाचे ट्रांसफार्मर असणारे कनेक्शन बॉक्स पूर्णपणे मोडकळीला आल्याने या ठिकाणी वारंवार फ्यूज जात असल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला असून महावितरण कार्यालयाकडे हे कनेक्शन बॉक्स बदलण्याची विनंती करत आहे मात्र गेंड्याची कातडी असलेल्या महावितरण कार्यालयाकडून शेतकऱ्याच्या विनंतीकडे कडकडीत दुर्लक्ष करण्यात येत आहे . कसबा तारळे महावितरण कार्यालया अंतर्गत येणाऱ्या कंथेवाडी या ठिकाणी असणाऱ्या 200 ट्रान्सफॉर्मरवरती दिवसातून कमीत कमी पाच ते सहा वेळा फ्युज जात असल्याने एकूण दिवसा आठ तासापैकी शेतकऱ्याला दीड ते दोनच तास वीज मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे पाण्याचे फेर तब्बल दोन दोन महिने वाढल्याने ऐन उन्हाळ्यात पिके वाळत आहेत मात्र महावितरण खाते याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून सुस्त पडले आहे.

येथील फ्युज बॉक्स पूर्णपणे निकामी झाल्याने फ्युज बसवण्यासाठी येणार्‍या वायरमेनचीही मोठी झडती होत आहे दर दोन ते तीन तासाने त्यांना आसपासच्या भागांमध्ये खेटे घालावे लागत आहेत त्यातही पूर्णपणे मोडकळीस आलेले फ्युज बॉक्स हाताळताना वायरमननाही त्याचा प्रचंड धोका आहे तरी जीवावर उदार होऊन हे लोक काम करत आहेत . मात्र महावितरण खात्याचे लक्षच नसल्याने येथील शेतकऱ्यांची प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की सध्या कोरोणा सारख्या महामारीत शेतकरी राजा एकटाच कार्य करत आहे आणि त्याच्या या कळकळीच्या विनंतीला प्रशासनाने साद द्यावी अशी विनंती येथील शेतकरी करत आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks