ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुसळधार पावसामुळे करुळ घाटातील रस्त्यावरील कठडा घसरल्याने रस्ता खचला! एकेरी वाहतूक सुरू

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
गेल्या दोन दिवसांपासून गगनबावडा तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे करुळ घाटात रस्त्याच्या दरीकडील बाजूस असलेल्या मोरीचा कठडा घसरल्याने रस्त्याचा थोडा भाग खचला आहे.
सतत सुरू असणाऱ्या या पावसामुळे घाटात दरड कोसळल्याची देखील दाट शक्यता आहे. सध्या रस्त्याचा भाग खचल्याने करूळ घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे. वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव आपल्या सहकार्यांसह करुळ घाटातील एकंदरीत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
आज पहाटे घटलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पो. हेड काँन्स्टेबल राजू जामसंडेकर, पोलीस नाईक मारुती साखरे, पोलीस नाईक गणेश भोवड घटनास्थळी दाखल झाले आहेत.