ताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.श्रीकृष्ण देशमुख काकांच्या पायाला स्पर्श म्हणजे आमच्या हातांचे भाग्य. : इंद्रजीत देशमुख ; डॉ.श्रीकृष्ण देशमुख ” मुरगूड भूषण ” पुरस्काराने सन्मानित

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

डॉ.श्रीकृष्ण देखमुख काकांच्या पायांना स्पर्श म्हणजे आमच्या हातांचे भाग्य असे भावस्पर्शी उद्गार शिवम प्रतिष्ठानचे प्रणेते इंद्रजीत देखमुख यांनी काढले. ते मुरगूड ता. कागल येथील डॉ.श्रीकृष्ण देशमुख यांच्या मुरगूड भूषण पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.

स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सोडून असंख्य भाविक-भक्तना गेली ५० वर्षे आध्यात्मिक ज्ञानाचे मार्गदर्शन करणाऱ्या ९१ वर्षीय डॉ.श्रीकृष्ण देशमुख यांना ७९ व्या स्वातंत्र्यदिनी मुरगूड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.एम.जे.लकी इंटर नॅशनल स्कूल यांचेवतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

शब्दप्रभू इंद्रजीत देशमुख यांच्या सुश्राव्य वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. डॉ.देशमुख यांच्या आध्यात्मिक सेवेचा आढावा घेतांना ते म्हणाले की डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे भाव आज ही उमलत्या फुलांसमान आहेत.सभागृहाबाहेर पाऊस पडतो आहे. तो ही त्यांना ताजेपणाच्या शुभेच्छा देण्यासाठी
आला असावा.

मुरगूड भूषण पुरस्कार समिती व एम.जे.लकी इंटर नॅशनल स्कूल यांच्या सौज्यन्याने हा सोहळा आयोजित केला होता.डॉक्टरांच्या या सत्कार सोहळ्यास दूर दूर वरून भक्तगण आले होते.यावेळी जावेद मकानदार यांचाही सार्वजनिक सेवेतील योगदाना बद्दल सत्कार करण्यात आला.

यशस्वी उद्योजक मोहन कृष्णा गुजर व आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू नंदिनी साळोखे च्या मातोश्री श्रीमती सरिता बाजीराव साळोखे (जिजामाता पुरस्कार) यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

वक्तृत्व व गायन स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्ती पत्रके वितरित करण्यात आली.

यावेळी माजी नगरसेवक सुहास खराडे, इंजि. प्रविण दाभोळे,डॉ संजय रामशे,संतोष भोसले , उद्योजक विजय सापळे ,संजय घोडके, गणेश नागरी पतसंस्थेचे चेअरमन सोमनाथ यरनाळकर ,सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, चंद्रकांत तिकडे,शिक्षक वृंद,एम.जे.ग्रुप चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.जस्मिन जमादार यांनी केले.राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks