ताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. राधाकृष्णन यांच्या विचारातील शिक्षक घडणे महत्वाचे : प्राचार्य डॉ.आर.डी.बेलेकर; महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.आर.के.शेळके यांना प्रेरणा प्रतिष्ठानचा कृतिशील प्राध्यापक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार.

गारगोटी :

आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री मौनी विद्यापीठाचे संचालक डॉ.आर.डी.बेलेकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

5 सप्टेंबर हा दिवस स्वतंत्र भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो खऱ्या अर्थाने शिक्षणशास्त्राच्या प्रशिक्षणार्थ्यांनी डॉ.राधाकृष्णन यांच्या विचारातील शिक्षक बनणे महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आर. के. शेळके यांना प्रेरणा प्रतिष्ठान, मंगळवेढा जि. सोलापूर यांचा विशेष कृतिशील प्राध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ.आर.के. शेळके यांच्या विषयी बोलताना एका संघर्षमय जीवनातून पुढे आलेला प्राध्यापक म्हणून त्यांच्याबद्दल गौरवोद्गार प्राचार्य डॉ.आर.डी.बेलेकर यांनी काढले.

या प्रसंगी वरिष्ठ लिपिक पदी पदोन्नती मिळालेबद्दल श्री संग्राम शिवूडकर यांचा सत्कार प्राचार्य डॉ. आर. डी. बेलेकर यांचे हस्ते तर सौ. शीतल पाटील यांची ग्रंथालय परिचरपदी पदोन्नती झालेबद्दल डॉ. पी. एस. देसाई यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन केले.

कार्यक्रमाची सुरुवात भितीपत्रीका उद्घाटनाने झाली. दीप प्रज्वलन व फोटो पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर.डी. बेलेकर व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व मान्यवरांच्या हस्ते झाले. मान्यवरांचे स्वागत बी. एड. प्रथम वर्ष छात्रप्रशिक्षणार्थी यांच्या हस्ते झाले.

5 सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती यांच्या जन्मदिनी सर्व भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाच सप्टेंबर रोजी आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय गारगोटी येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बी. एड. प्रथम वर्ष छात्र प्रशिक्षणार्थ्यांनी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

शिक्षक दिन कार्यक्रमाची रूपरेषा महाविद्यालयाचे प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एड. प्रथम वर्ष छात्र प्रशिक्षणार्थ्यांनी कार्यक्रम योग्यरीत्या पार पाडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जॉर्ज डिमेलो यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णात कांबळे यांनी केले.
प्रशिक्षणार्थी मनोगतामध्ये बी. एड. प्रथम वर्ष छात्र प्रशिक्षणार्थी दिग्विजय भोसले, प्राजक्ता देसाई, अनिल वारके व सुजाता पाटील यांनी शिक्षक दिनी आपल्या गुरुजनांना वंदन केले.

मार्गदर्शक मनोगतामध्ये महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.पी.बी.दराडे यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारातील शिक्षक शिक्षकांची संकल्पना, शिक्षकांची गुणवत्ता व शिक्षकाची कार्यनिती याची माहिती देऊन विद्यापीठाचे संस्थापक डॉ.जे.पी.नाईक यांचे शिक्षकांबद्दलचे विचार व्यक्त केले.

सत्कार मूर्ती महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.आर.के.शेळके यांनी महाविद्यालयाने केलेल्या सत्काराबद्दल आभार मानत असतानाच आपल्या शैक्षणिक जीवनाचा संघर्षमय प्रवास त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सांगितला. सांगोला सारख्या दुष्काळी तालुक्यामधून येऊन त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. ज्या गावांमध्ये आजही एस.टी. बसची सोय नाही, त्या गावांमधून पहिले एम.एड. पहिले पीएच.डी. व पहिले सेट-नेट पात्रता पूर्ण करणारे प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती आहे. याच कार्यांचा आढावा घेऊन प्रेरणा प्रतिष्ठान, मंगळवेढा जि. सोलापूर यांनी त्यांना कृतिशील प्राध्यापक हा पुरस्कार प्रदान केला. कृतिशील प्राध्यापक पुरस्कार हा चालू वर्षी सुरू केल्यामुळे या पुरस्काराचे पहिले मानकरी प्राध्यापक डॉ. आर.के. शेळके हे ठरले

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी.बेलेकर, महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. के. शेळके, डॉ.पी.बी. दराडे ,डॉ.पी.एस. देसाई, डॉ.सौ. एम. एन. मोरे ,बी. आय. पाटील, ग्रंथालय परिचर शितल पाटील यांच्यासह बी.एड.प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रमाचे आभार बी. एड. प्रथम वर्ष छात्र प्रशिक्षणार्थी रणजीत मोरे यांनी मांडले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks