डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बिंदुचौक येथे पुष्पहार अर्पण करून केले विनम्र अभिवादन

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले बाबासाहेबांचा पहिला पुतळा आणि तोही ते हयात असताना कोल्हापुरच्या बिंदू चौकात भाई माधवराव बागल यांनी 1950 साली उभारला. याच बिंदू चौकात आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहून महामानवाला आदरांजली वाहिली. त्यांच्या स्मृतींचे स्मरण केले.
“घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एका चांगल्या वसतिगृहाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. जेणेकरून जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक सुविधा मिळतील. याठिकाणी लवकरच भव्य बौद्धविहार बांधण्याचाही माझा मानस आहे. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करणार”, असं कार्यक्रमानंतर पत्रकार बोलताना महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ, कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.