मुरगूड येथील श्री व्यापारी नागरी सह.पतसंस्थेत लाभांश वाटप कार्यक्रम

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता . कागल येथिल विश्वसनीय पतसंस्था म्हणून अल्पावधित नावारूपास आलेली श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये २०२४ / २५ सालातील लाभांश वाटप सभासदांच्या उपस्थितीत करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर होते .
यावेळी संचालक किशोर पोतदार यानीं जुलै अखेरच्या सांपत्तिक स्थितीची थोडक्यात आढावा घेतला. ते म्हणाले, जुलै अखेर संस्थेकडे २३ कोटी ३६ लाख इतक्या ठेवी आहेत. संस्थेचे कर्ज वाटप १७ कोटी ७० लाख त्यापैकी सोनेतारण १२ कोटी दहा लाख हे सुरक्षित कर्ज आहे .संस्थेकडे गुंतवणूक आठ कोटी १७ लाख व संस्थेचा चालू नफा ७ लाख ३५ हजार इतका झाला आहे . तरी संस्थेच्या सभासदांनी संस्थेकडे आपले सर्व व्यवहार करून संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्यास आपले मोलाचे सहकार्य करावे अशी विनंती पोतदार यांनी केली. यावेळी संस्थेच्या सभासदांना डिव्हिडंट चे वितरण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री जवाहर शहा यानीं संस्थेच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महादेव तांबट, सुशांत शिंदे ,पृथ्वीराज कदम, रामचंद्र हवालदार, सुधीर आमले, सूर्यकांत जाधव यांच्यासह सभासद उपस्थित होते.
लाभांश वाटप कार्यक्रमास संस्थेचे व्हाईट चेअरमन प्रकाश सणगर संचालक सर्वश्री प्रशांत शहा, नामदेव पाटील, संदीप कांबळे ,सातापा पाटील ,निवास कदम ,धोंडीबा मकानदार, शशिकांत दरेकर, संचालिका सौ . रोहिणी तांबट व सौ .सुनंदा जाधव कार्यकारी संचालक सुदर्शन हुंडेकर यांच्यासह कर्मचारी वर्ग , सभासद उपस्थित होते. आभार हाजी धोंडीबा मकानदार यांनी मानले .