ताज्या बातम्यामहाराष्ट्र

१० वी, १२ वी पुरवणी परिक्षेबाबत जिल्हा दक्षता समितीची सभा संपन्न; जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला परीक्षेच्या संपूर्ण आयोजनाबाबतचा आढावा 

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी ) परीक्षा सप्टेंबर -आक्टोबर 2021 परीक्षेच्या आयोजना संदर्भात जिल्हा दक्षता समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत परीक्षेच्या संपूर्ण आयोजनाबाबतचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

जिल्ह्यामध्ये 10 वी व 12 वी च्या प्रश्नपत्रिका वितरण व उत्तर पत्रिका संकलनासाठी विभागीय मंडळामार्फत एकुण 8 परीरक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 12 वी साठी जिल्ह्यात 10 परिक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून 10 वी साठी एकूण 11 परिक्षा केंद्रे निश्चित केली आहेत. परिरक्षक, सहा, परिरक्षक व केंद्रसंचालक यांच्या नियुक्त्या कोल्हापूर विभागीय मंडळाकडून करण्यात आली आहे. तसेच परीरक्षक कार्यालय व परिक्षा केंद्र येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. या परीक्षेच्या आयोजनामध्ये कोविड 19 संदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना केंद्र संचालकांना देण्यात आलेल्या आहेत.

परीक्षेच्या काटेकोर संचालनासाठी ज्या शाळेत परीक्षा केंद्र आहे त्या शाळेतील शिक्षकांची नेमणूक पर्यवेक्षक म्हणून करण्यात येऊ नये. तसेच एकाच शाळेचे दोन शिक्षक एकाच परीक्षा केंद्रावर नेमण्यात येऊ नयेत. ज्या विषयाची परीक्षा आहे त्या विषयाचा शिक्षक पर्यवेक्षक म्हणून नेमू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी यावेळी दिल्या. परीक्षेदरम्यान महसूल विभागाकडील भरारी पथके नेमून परिक्षेचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी संबंधित महसूल अधिका-यांना सुचना देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आवश्यक पोलिस बंदोबस्त पुरविण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांना त्यांनी सुचना दिल्या.

बैठकीस शिक्षणाधिकारी (प्राथ) आशा उबाळे, पोलिस विभागाचे रामदास कोळी तसेच निरंतर शिक्षण विभागाचे प्रतिनिधी राज म्हैंदरकर, गजानन उकिर्डे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) बी. एम. किल्लेदार उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks