किरीट सोमय्या मंगळवारवारी मुरगूडमध्ये येणार असलेचे पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुखांची मुरगूड पोलीस ठाण्याला भेट

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या मंगळवार, दि. २८ सप्टेंबर रोजी मुरगूडमध्ये येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील यांनी मुरगूड पोलीस ठाण्याला भेट दिली.
किरीट सोमय्या हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत फिर्याद देण्याकरिता मुरगूडमध्ये येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता विचारात घेऊन पोलीस अधिकाऱ्यांनी मुरगूड पोलीस ठाण्याला भेट दिली.
डीवायएसपी पाटील यांनी नगरपालिकेत पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन शांततेचे आवाहन केले. पोलीस प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन सोमय्या यांना काळे झेंडेही न लावण्याचा निर्णय घेतल्याचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सांगितले. यावेळी सपोनि विकास बडवे, किशोरकुमार खाडे, कुमार ढेरे, दत्ता चौगले, पक्षप्रतोद संदीप कलकुटकी, विरोधी पक्षनेता राहुल वंडकर, रणजित सूर्यवंशी, नगरसेवक रविराज परीट, दत्ता मंडलिक, राजू आमते आदींनी चर्चेत सहभाग घेतला.