जीवनमंत्रताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

भुदरगड तालुक्यातील स्वयंरोजगार संस्थांना टेबल व खुर्ची वाटप कार्यक्रम मुदाळतिट्टा येथे संपन्न

मुदाळतिट्टा :

मुदाळतिट्टा (ता. भुदरगड) येथील महाराष्ट्र एन.जी.ओ. समितीच्या कार्यालयामध्ये आज भुदरगड तालुक्यातील तीस स्वयंरोजगार संस्थांना टेबल व खुर्ची चे वाटप करण्यात आले. टेबल व खुर्ची चे वाटप सकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्याध्यक्ष युवराज येडूरे, निकाल न्यूजचे संपादक मंगेश कोरे व महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्य संपर्कप्रमुख संदीप बोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

दुपारच्या सत्रामध्ये स्वयंरोजगार संस्थांच्या चेअरमन व सचिव यांना “रोजगारातील नाविन्य” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ई-निविदा सल्लागार हर्षद बर्गे, सॉफ्टकल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक चिन्मय देशपांडे व आर्थिक नियोजन सल्लागार मयूर मोरे यांनी कार्यशाळेमध्ये उपस्थित संस्थेच्या पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी अमित कोरे, उदय कांबळे, सौरभ कांबळे यांच्यासह भुदरगड तालुक्यातील स्वयंरोजगार सेवा संस्थांचे चेअरमन व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks