ताज्या बातम्या
दाजीपूर केंद्राअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; मुंबईच्या रश्मीज स्माईल ट्रस्टचा उपक्रम

कुडूत्री प्रतिनिधी :
रश्मीज स्माईल ट्रस्ट मुंबई या सेवाभावी संस्थेच्या वतीने दाजीपूर केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर,टुथब्रश,पेन, सॅनिटरी पॅड,चित्रकला वही,कलर पेटी, कंपास, बिस्किटे, पुस्तके इ साहित्य प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी ट्रस्टच्या सचिव डॉ.डॉक्टर भावना कुचेरिया ,मेडिकल इन्चार्ज मा.डॉ. सुहास कुचेरीया, शाह परिवार तसेच पटेल कुटुंबीय इत्यादी स्माईल ट्रस्टची टीम उपस्थित होती.
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित विद्या मंदिर तिटवे शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. संभाजी पाटील सर यांच्या सहकार्यातुन व प्रेरणेतून हे साहित्य वितरित करण्यात आले.
ग्रामीण दुर्गम भागातील मुलांना शहरी भागातील मुलांप्रमाणे शैक्षणिक साहित्य मिळून शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन जाण्यासाठी नाविन्यपूर्ण साहित्य विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले.