क.सांगाव आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची भरती करा पुरोगामी संघर्ष परिषदेची तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

क.सांगाव :-
पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने कागल च्या नायब तहसीलदार अर्चना कुलकर्णी यांना क.सांगाव (तालुका कागल) येथील आरोग्य केंद्रात शिपाई व नर्स या कर्मचाऱ्यांची ताबडतोब भरती करा अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे .

पुरोगामी संघर्ष परिषदेचे युवक जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख दीपक शिंगे यांचे प्रमुख उपस्थितीत सदर निवेदन देण्यात आले यावेळी मंगेश हेगडे उपस्थित होते. निवेदनात पुढे म्हटले आहे की, क.सांगाव आरोग्य केंद्रात अपुरे कर्मचारी असल्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्यावर कामाचा ताण येत असून रुग्णांना आणखीन सेवा सुलभ होण्यासाठी ताबडतोब कर्मचारी भरावेत अपुरे कर्मचारी गेली पाच वर्ष या ठिकाणी आहेत तरी जेवढी आवश्यकता आहे तेवढी व सध्या या केंद्रात चार शिपायांच्या जागा असून एकच शिपाई कार्यरत आहे आणि तीन जागा रिक्तच आहेत.याची गांभीर्याने दखल घेऊन कर्मचारी भरावे अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने कागल तहसीलदार वर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.