ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गणेशवाडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित शिवाजी विद्यानिकेतन शाळेमध्ये विद्यार्थ्यांना फळे वाटप

सावरवाडी प्रतिनिधी :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्य गणेशवाडी ( ता . करवीर ) येथील शिवाजी विद्यानिकेतनच्या विद्यार्थांना भाजप करवीर तालुका तर्फ शुक्रवारी फळे वाटप कार्यक्रम संपन्न झाला .
शाळेच्या प्रांगणात माजी सैनिक भिकाजी जाधव , दिलीप खाडे , सुभाष पाटील , शिवाजी बुवा , अजितसिंह चव्हाण, संभाजी पाटील एसबी देवणे , रमेश खाडे आदि मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थाना फळे वाटप करण्यात आले . यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याविषयी भिकाजी जाधव शिवाजीबुवा , संभाजी पाटील आदिनी मनोगत व्यक्त केले .
प्रारंभी विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले . प्रास्ताविक राजर्षि शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव यादव यांनी प्रास्ताविक केले . शेवटी ज्ञानदेव यादव यांनी आभार मानले.