शिवराज विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये मुरगूड मध्ये मोफत एसटी पास चे वितरण.

मुरगुड प्रतिनिधी: विजय मोरबाळे
शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज मुरगूड मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच 350 विद्यार्थिनींना मुरगूड वाहतूक निरीक्षक श्री एस एस लिमकर व वाहतूक नियंत्रक श्री बि डी परीट यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत एसटी पास वितरण करण्यात आले.
याप्रसंगी शिवराज विद्यालयाचे प्राचार्य व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य बीआर बुगडे, उपप्राचार्य प्रा. आर बी शिंदे, कोल्हापूर राज्य राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा बी डी चौगुले ,प्रा पी डी धायगुडे व शिवराज विद्यालयाचे एसटी पास वितरण समन्वयक प्रा. पी एस डवरी व विद्यार्थिनी इ. उपस्थित होते. वाहक श्री भोसले एम बी एकल,श्री कोंडेकर यांच्या हस्ते पास प्रदान करण्यात आले.
ग्रामीण भागातील लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींना तिमाही मोफत पास योजनेच्या माध्यमातून विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. मुरगूड आणि परिसरातील पंचक्रोशीतून हजारो विद्यार्थिनी एसटी च्या माध्यमातून ये जा करत असतात. दुर्गम भागातून शिकणाऱ्या विद्यार्थिनींना या माध्यमातून शिक्षण घेण्याची जिद्द प्राप्त होता आहे.
या कनिष्ठ महाविद्यालयात मुरगूड व कागल तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक गावातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी प्रवेश घेत असतात मोफत बस पास कॉलेजमध्ये मिळत असल्यामुळे वेळेची बचत होते त्यामुळे विद्यार्थिनींना अभ्यासाकडे जास्त लक्ष देता येते. त्यामुळे आज पर्यंत अनेक विद्यार्थिनी गुणवत्ता यादी मध्ये आलेले आहेत. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी तिमाही मोफत पास मिळाल्यामुळे विद्यार्थिनींची येण्या जाण्याची सोय झाल्याने सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी कॉलेजला व परिवहन महामंडळाला धन्यवाद दिले आहेत. विद्यार्थी व पालकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.