ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महे येथे मान्यवर व्यक्तींचा  सत्कार समारंभ संपन्न

सावरवाडी प्रतिनिधी :

समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून केलेले कार्य अजरामर राहते  . नव्या बदलत्या युगात  आदर्श  विचाराचा प्रसार होण्यासाठी युवकांचा पुढाकार महत्वाचा असतो  .असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले .

        करवीर तालुक्यातील  महे येथे कै पांडूरंग कांबळे प्रतिष्ठानतर्फ गावातील  विद्यार्थी , शिक्षक ,डॉक्टर आदि मान्यवर व्यक्तीच्या आयोजित सत्कार समारंभ  प्रसंगी  नरके बोलत होते . अध्यक्षस्थानी सरपंच सज्जन पाटील होते

                  यावेळी बोलतांना गोकूळचे संचालक अजित नरके म्हणाले जूण्या पिढीतील लोक हे ध्येयवादी होते . समतेच्या विचारातून एकात्मता प्रकट होते . नव्या पिढीला वैचारिक ज्ञानाची खरी गरज आहे . गावागावात परिवर्तन विचार अभिप्रेत आहेत

                  कार्यक्रमात सरपंच सज्जन पाटील ,हंबीरराव पाटील , उत्तम वरूटे , दादू लाड , आदिनी  मनोगत व्यक्त केले .  सागर कांबळे यांनी प्रास्ताविक  केले  आदित्य पाटील यांनी आभार मानले कार्यक्रमास  मोहन पाटील , नामदेव भास्कर , सरपंच सज्जन पाटील , रुपाली बोराटे , सर्जेराव हूजरे , पांडुरंग पाटील  ,संभाजी पाटील , पांडुरंग पैलवान,  पंडित पाटील , युवराज बोराटे  आदि उपस्थित होते . 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks