ताज्या बातम्यामहाराष्ट्र
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करावी ; काँग्रेसची मागणी

अजित पवार यांनी ३० जून रोजी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करावी, असे पत्र मंगळवारी काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिले. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना बुधवारी विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाच्या नावाची अधिकृत घोषणा होईल.
दुसऱ्यांदा वर्णी –
२०१९ साली राधाकृष्ण विखे-पाटील हे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन भाजपात गेल्याने वडेट्टीवार प्रथमच विराेधी पक्षनेते झाले हाेते.
महत्त्वाची पदे विदर्भाकडे –
विदर्भाकडे प्रदेशाध्यक्षपदाबरोबर आता विरोधी पक्षनेतेपदही गेले आहे.