कागल तालुका आजी-माजी सैनिक शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेमार्फत शेतकरी परिसंवादाचे आयोजन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कुरुकली (ता.कागल) येथे कागल तालुका आजी माजी सैनिक शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेमार्फत डॉ. संजीव माने कृषीभूषण यांच्या मार्गदर्शनाने परिसंवादाचे आयोजन केले होते सदर शेतकरी परिसंवादास स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विकासराव हंबीरराव पाटील यांनी केले .
कृषी भूषण डॉ. संजीव माने यांनीऊस उत्पादन एकरी सव्वाशे टन ऊस उत्पादन कसे कसे काढावे व खोडवा उसाचे नियोजन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले .त्याच बरोबर शेतकऱ्यांनी ऊस लागण कशी करावी, पाण्याची नियोजन कसे करावे, ऊस लागण सरी किती फुटाची असावी, ऊस किती महिन्यानंतर तोडावा, उसाला कोणती लागवड टाकावी व खोडव्याचे नियोजन कसे करावे असे अनेक प्रश्न विचारून डॉ.संजीव माने यांचे मार्गदर्शन घेतले.
सदर परिसंवादास घोडेकर विकास सेवा संस्थेचे चेअरमन आदरणीय बी आर पाटील, बिद्री ऊस विकास अधिकारी उदय पाटील ,माजी सरपंच वसंत पाटील, बी.पी. पाटील, आनंदराव साळुंखे, प्रकाश बचाराम पाटील, अमित कांबळे ,तेजस पाटील, जगदीश पाटील, विजय पाटील, विनायक पाटील, राम गुरुजी, सतीश बाचनकर ,दत्तात्रय कांबळे ,महादेव दाभोळे, अशोक चौगुले, बाळासाहेब धोंडराम पाटील यांचेसह कुरुकली परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन गिरीश सयाजीराव पाटील यांनी मानले.