बिद्रीत महाविकास आघाडीची निदर्शने

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात पुकारलेल्या ‘ महाराष्ट्र बंद ‘ ला आज बिद्री परिसरात व्यापारी, दुकानदार यांनी आपले व्यवहार बंद ठेवत पाठींबा दिला. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध फेरी काढली. कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करुन निदर्शने करित रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. मुरगूड पोलिसांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन करित रास्ता रोको मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या बाजूला उभे राहून निदर्शने करत वाहतूक सुरु केली.
यावेळी जि.प. सदस्य मनोज फराकटे, कागल तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विकास पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे, जगदिश पाटील, डी.एम. चौगले, रघुनाथ कुंभार, नंदकुमार पाटील, पं.स. सदस्य जयदिप पोवार, प्रवीण पाटील, नागेश आसबे, राजेंद्र चौगले, बाळासाहेब फराकटे, विनोद पाटील यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.