मुरगुड येथे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
छत्रपती शिवरायांना ज्यांनी स्वराज्याची प्रेरणा दिली त्या राजमाता जिजाऊ आणि संपूर्ण जगाला ज्ञानाच्या माध्यमातून शिकवण दिली असे स्वामी विवेकानंद यांची जयंती मुरगुड येथील शिवतीर्थ येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी सदाशिवराव मंडलिक प्रशालेच्या मुख्याध्यापिका योगिनी शेटे, हमिदवाडा प्राथमिक प्रशालेच्या शिक्षिका गीता शिंदे ,शिवराज विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक महादेव कानकेकर, मुरगूड विद्यालय प्रशालेचे शिक्षक अनिल पाटील, आणि सेवानिवृत्त प्रा. संभाजीराव आंगज यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना अनिल पाटील म्हणाले की जर हा देश विवेकानंद यांच्या विचाराच्या वाटेवर चालला तर आपला देश नक्कीच समृद्ध होईल विवेकानंद यांनी आपले आगाढ ज्ञान संपूर्ण देशापुढे मांडले यामुळे त्यांच्या विचाराचा जागर सर्वत्र झाला.
गीता शिंदे यांनी बोलताना सांगितले की राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याची प्रेरणा दिली आणि यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्मिती केली आणि या संपूर्ण रयतेला परकीय आक्रमणापासून होणाऱ्या त्रासापासून मुक्त केले यावेळी महादेव कानकेकर , योगिनी शेटे, संकेत भोसले यांनी मनोगत मांडली.
यावेळी रणजीत सूर्यवंशी, शिवभक्त सर्जेराव भाट, दगडू शेणवी ,ओंकार पोतदार, प्रा. रवींद्र शिंदे, बजरंग सोनुले, व्ही आर भोसले, सुनील रणनवरे, महादेव वागणेकर ,संग्राम डवरी, युवराज सुर्यवंशी,अशोक खंडागळे, प्रशांत कुडवे, तानाजी भराडे, प्रकाश परिशवाड, प्रशांत सिद्धेश्वर, संकेत शहा, जगदीश गुरव, आरडी चौगुले, शुभम वंडकर,अमोल कांबळे, वासूदेव मेटकर, शशिकांत मेंडके, तुषार कुलकर्णी गणेश भाट यांच्यासह मुरगुड पोलीस स्टेशनचे सतीश वर्णे, सचिन पारखे, अनिल जरग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.