बांधकाम कामगारांच्यात संभ्रम निर्माण करू नये

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
बांधकाम कामगारांच्यात काही संघटना स्मार्ट कार्ड व नोंदणीच्या च्या बाबतीत संभ्रम निर्माण करीत आहेत तरी चंदगड तालुक्यातील बांधकाम कामगारांना कळविण्यात येथे की आमच्या निदर्शनास आलेल्या नुसार तालुक्यातील इतर काही संघटना आहेत त्या संघटनांचे लोक बांधकाम कामगारांच्यात संभ्रम निर्माण करीत आहेत आपल्या संघटनेकडून आँनलाईन नोंदणी केली की आम्ही तुम्हाला एक महीन्याच्या आत स्मार्ट कार्ड देतो.आसे सांगुन संभ्रम निर्माण करीत आहेत तरी आसल्या आफवा वरती बांधकाम कामगार बंधूंनी विश्वास ठेवू नये.सांगायचे तात्पर्य म्हणजे मुळात त्यांना नोंदणी केल्या नंतर कीती दिवसांनी स्मार्ट कार्ड मिळते त्याची प्रोशीजर काय आहे हे त्यांना माहिती नाही.
तुम्ही आँनलाईन फाँर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचा फाँर्म मंजूर करण्यात आला आहे आसा मँसेज तुमच्या मोबाईल नंबर वरती 40 ते 50 दिवसांनी येतो त्या नंतर तुमची आँनलाईन फी भरली जाते व त्या नंतर कमीत कमी 15 ते 20 दिवसांनी स्मार्ट कार्ड दिले जाते त्यामुळे आमच्या कडे नोंदणी करा तुम्हाला 15 ते 30 दिवसात स्मार्ट कार्ड देतो म्हणून सागुन कामगारांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्यात येत आहे तरी तालुक्यातील बांधकाम कामगार बंधूंनी आशा कोणत्याही आफवा वरती विश्वास ठेवू नये आँनलाईन केल्या नंतर त्याची प्रोशीजर पुर्ण होऊन तुम्हाला स्मार्ट कार्ड मिळायला कमीत कमी दिड ते दोन महिण्याचा कालावधी लागतो.असे कलाप्पा निवगीरे अध्यक्ष कामगार सेना चंदगड, संस्थापक अध्यक्ष चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशन तडशिनहाळ यांनी कळविले आहे.