दत्त महिला सहकारी दुध संस्थेतर्फे सभासदांना दिवाळी लाभांश सात लाख रुपयांचे वाटप.

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील हसुर दुमाला येथील दत्त महिला सहकारी व्यवसाईक दुध संस्थेतर्फ सन२०२०- २१ सालाचा म्हैश दुध १९ टक्के तर गाय १७ टक्के दिवाळी सणाचा लाभांश व ठेव अशी एकूण सात लाख रुपयांचे वाटप विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
म्हैश लाभांश ३ लाख ६३ हजार २९३ रुपये तर गाय लांभांश ९७ हजार रुपये, ठेव २ लाख ३५ हजार रुपये असे एकूण सात लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. दिवाळी निमित्य प्रत्येक सभासदांना पाच किलो साखर वाटप करण्यात आली.
यावेळी संस्था संस्थापक नामदेव पाटील, संस्थेच्या अध्यक्षा शोभा पाटील, उपाध्यक्ष सुलाबाई ताटे, कमल पाटील, संगिता पाटील, गीता पाटील, सुनिता पाटील, योगिता ताटे, छाया कानुगडे, सुनिता झांजगे आदि उपस्थितीत होत. संस्थेचे सचिव विलास पाटील यांनी प्रास्ताविक केले शेवटी शिवाजी झांजगे यांनी आभार मानले.