ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मळगे खुर्द परिसरात गव्याचे दर्शन

मुरगुड प्रतिनिधी :
मळगे खुर्द- पिंपळगाव (ता. कागल) परिसरात बुधवारी रात्री अचानक काही लोकांना गव्याचे दर्शन झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
मळगे बुद्रुक शेतशिवारातून “एमआयडीसी’ कर्मचाऱ्यांना रात्री अकराच्या सुमारास गवा दिसला. तर पिंपळगाव बानगे रस्त्यावरून अनेक लोक नवरात्रौत्सव जागरासाठी चार चाकी गाडीतून जात असताना बानगे पिंपळगाव रस्त्यावर एक गवा अचानक आडवा आला होता. त्याच वेळी गाडीतील एका व्यक्तीने गव्याचा आपल्या मोबाईमध्ये व्हिडी चित्रण केले आहे. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर घालत आहे. गवा बानगे गावच्या दिशेने गेला असल्याची चर्चा मळगे खुर्द येथील ग्रामस्थांमध्ये होती .हा गवा मळगे खुर्दच्या दिशेने आला होता.