पिरळमध्ये दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण : दहा दिवस घेणार महिला दुग्धव्यवसायाचे पूरक प्रशिक्षण

कुडूत्री प्रतिनिधी :
पिरळ (ता. राधानगरी) येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद) तसेच जिल्हा परिषद कोल्हापूर, बँक ऑफ इंडिया,(कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण महिलांना दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.हे प्रशिक्षण दहा दिवस सुरू राहणार असून प्रशिक्षणात अनेक मार्गदर्शक माहिती देणार आहेत.
ग्रामीण महिलांना दुग्धव्यवसायाची परिपूर्ण माहिती व्हावी,दुधापासून कोणकोणते पदार्थ बनवले जातात, यशस्वी उद्योग कसा सुरू करावा, त्यासाठी कोकोणते ज्ञान आवश्यक असावे.जनावरांचे संगोपन आणि जनावरांची काळजी आदी दुग्धव्यवसायाशी संबंधित माहिती या प्रशिक्षणात मिळणार आहे.
या प्रशिक्षणात प्रशिक्षक म्हणून मदन पाटील,गजानन भोसले,रणजित साळोखे,प्रशांत पाटील,विजय पाटील,सचिन हुजरे,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.कार्यक्रमात,सभापती सोनाली पाटील,माजी सभापती दिलीप कांबळे,दिपक पाटील (कांबळवाडी)सरपंच मारुती चौगले व सदस्य आदी सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रशिक्षण कार्यक्रमास मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर सावंत यांनी तर ग्राम संघाच्या अध्यक्ष मेघा मुरगुडे यांनी मानले.