मुरगूड मध्ये रविवारी (दि.१७) रोजी रंगणार दही हंडीचा थरार ; मंडलिक प्रेमी यांचेवतीने कार्यक्रमाचे आयोजन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता. कागल येथे प्रथमच रविवार १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वा. मंडलिक प्रेमी शिवसेनेच्या वतीने दहीहंडी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. अनेक दशकानंतर या स्पर्धा येथे होणार असल्यामुळे या स्पर्धेबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड औत्सुक्य आहे
पत्रकार परिषदेमध्ये आज या स्पर्धेविषयी सविस्तर माहिती संयोजन कमिटीने दिली. यावेळी यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरिक्षक विरेंद्र मंडलिक, संयोजन समितीचे सदस्य व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
मुरगूड येथील कन्या शाळेच्या पटांगणावर कागल तालुक्यातील ही पहिलीच मानाची भव्य दहिहंडी स्पर्धा असून स्पर्धेतील अजिक्य ठरणाऱ्या संघाला १ लाख रूपयांचे रोख बक्षिस मिळणार आहेत. हे बक्षिस पटकावण्यासाठी गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. माजी खासदार संजय मंडलिक व पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरिक्षक विरेंद्र मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पड़णर आहे. आरोग्य मंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षिरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयश्रीताई जाधव, सत्यजित उर्फ नाना कदम व शारंगधर देशमुख, सुजीत चव्हाण यांच्यासह जिल्यातील शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना निमंत्रण देण्यात येणार आहे.
प्रत्येक गोविंदा पथकाला प्रोत्साहनपर अन्य बक्षिसांचाही वर्षाव होणार आहे. पहिल्याच प्रयत्नात सहा थर लावून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला ११ हजार रूपयाचे पारितोषीक देण्यात येणार आहे. स्पर्धेचे सर्व नियंत्रण सार्थ सागर फॉउंडेशनकडून होणार आहे. वरच्या धरावर चढून दहिहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय केले जातील, जखमी गोविंदावर तत्परतेने उपचार करण्यासाठी समीट अॅडव्हेंचर आणि हिल रायडर अॅडव्हेंचरचे कार्यकर्ते तसेच ग्रामीण रुग्णालय मुरगूड व मुरगूड नगरपरिषद यांच्या रूग्णवाहिकांसह डॉक्टराचे पथक सज्ज असेल.
दहिहंडी फोडणारा सर्वात वरच्या थरावरील गोविंदा १४ वर्षावरील असावा या नियमाचे काटेकोर पालन केले जाईल. तर सर्व गोविदांना १० लाख रूपयांपर्यंतचे अपघाती विमा कवच असणार आहे. मंडलिक प्रेमी दहीहंडी निमित्ताने रिल्स स्पर्धाही आयोजित केल्या आहेत. सर्वोत्कृष्ट रिल्सला अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार रूपयांचे रोख पारितोषीक दिले जाईल.