ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंगळवार पेठेतील महानगरपालिकेच्या शाळेत पोषण आहारात आळ्या सापडल्याने खळबळ

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे

मंगळवार पेठेतील महानगरपालिकेच्या एका शाळेत पोषण आहारातील खिचडीच्या भातात आळ्या सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयात ही घटना घडली असून सदरची बाब विद्यार्थिनीच्या लक्षात आली.
कोल्हापुरातील महापालिका शाळेमध्ये पोषण आहार दिला जातो. मंगळवार पेठेतील अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयात बुधवारी खिचडीच्या भातात एका विद्यार्थिनीला आळ्या सापडल्या. तिने हा प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला. याबाबतची माहिती महापालिका अधिकारी आणि पालकांना मिळताच उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विद्या पोळ, मनपा शिक्षण प्रशासन अधिकारी डीसी कुंभार यांच्यासह अभिजीत देवणे, सामाजिक कार्यकर्ते नियाज खान, अंजुम देसाई यांनी शाळेत येऊन पाहणी केली. या शाळेतील जेवणाचा ठेका हा मनपा शिक्षण प्रशासन अधिकारी डीसी कुंभार यांनी नीलाक्षी बचत गट, सांगली यांना दिला होता. यामुळे कार्यकर्त्यांनी कुंभार यांना धारेवर धरले. या घटनेचा सहाय्यक आयुक्त विद्या पोळ यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. उद्यापासून देण्यात येणारा पोषण आहार बंद करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks