ताज्या बातम्या
गणेश विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चौघांवर गुन्हा ; मुरगुड पोलिसांची कारवाही

मुरगूड प्रतिनिधी :
कागल तालुक्यातील हमीदवाडा येथे साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यास बंदी असताना नियमांचे उल्लंघन केलेप्रकरणी मुरगूड पोलिसांनी विघ्नहर्ता तरुण मंडळाच्या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला आहे.
अनंत चतुर्थी दिवशी कोणीही मिरवणूक काढू नये अशा सूचना सपोनि विकास बडवे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. पोलीस कर्मचारी सचिन आनंदराव निकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते प्रसाद मारुती ठाणेकर, उदय गणपती ठाणेकर, श्रीकांत अशोक गोधडी, संतोष दत्तात्रय ठाणेकर या चार जणांवर गुन्हा नोंद केला आहे.