आरोग्यताज्या बातम्या

गारगोटी येथे सन्मित्र स्पोर्ट्सच्यावतीने कोरोना लसीकरण; कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन या जागतिक महामारीला आळा घालण्याचे महत्वपूर्ण कार्य नागरिकांनी जबाबदारी म्हणून पूर्ण करावे : भाजप प्रदेश सचिव अलकेश कांदळकर

गारगोटी :

कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन या जागतिक महामारीला आळा घालण्याचे महत्वपूर्ण कार्य नागरिकांनी जबाबदारी म्हणून पूर्ण करावे असे आवाहन भाजप प्रदेश सचिव अलकेश कांदळकर यांनी केले. गारगोटी येथे सन्मित्र स्पोर्ट्सच्यावतीने कोरोना लसीकरण दुसऱ्या टप्प्यातील मोहीम राबविण्यात आली याप्रसंगी बोलत होते. सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून सोमवारी दिवसात 150 लोकांचे लसीकरण करण्यात आले.

सन्मित्र सोशल फौंडेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र मिणचे यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाला हरवूया, लसीकरण करूया, या उद्देशाने गरगोटीतील नागरिकांसाठी ही मोहीम राबवली होती.

गारगोटी शहर लोकसंख्येने मोठे आहे. यासाठी १८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करण्यासाठी अलकेश कांदळकर यांनी पुढाकार घेतला होता.

सन्मित्र नागरी सह पत संस्था येथे लसीकरणाची सोय केली होती. यामध्ये पहिल्या टप्प्यात 202 तर आजच्या दुसऱ्या टप्प्यात 150 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून लस घेतली.

या लसीकरण मोहीमेसाठी नियोजन बी जी निकम, मिणचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे एम एस देशपांडे, अमरसिंह शिंदे, योगेश मुदाळकर, विजय पाटील, संजय पाटील, प्रसाद पाटील, प्रवीण येलकर, अमर पाळेकर, मुस्तफा शेख, धनंजय धर्मरक्षी, योगीराज शिगावकर, भास्कर आबीटकर, संतोष किरोळकर यांनी केले होते. यावेळी आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks