ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता १ एप्रिलपासून टोल धाड ! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वाढला; प्रवास आणखी महागणार

टीम ऑनलाइन:

पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी दरवाढ झालेली असताना आता वाहने ठेवायची की विकायची अशी परिस्थिती येण्याची शक्यता आहे. आज मध्यरात्रीपासून टोलच्या दरात मोठी वाढ होणार आहे. एनएचएआयने राष्ट्रीय महामार्गांच्या टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्या १ एप्रिलपासून टोलच्या दरात मोठी वाढ होणार आहे. मध्यरात्री १२ वाजल्यापासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलच्या दरात १० ते ६५ रुपयांची वाढ केली आहे. छोट्या वाहनांसाठी १० ते १५ रुपये तर व्यावसायिक वाहनांसाठी ६५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

ही दरवाढ देशभरातील सर्वच टोलनाक्यांवर केली जाणार आहे. म्हणजे जर एखाद्या टोल नाक्यावर १०० रुपये टोल असेल तर तो १ एप्रिल २०२२ पासून ११० रुपये किंवा ११५ रुपये होणार आहे. महाराष्ट्रात अद्याप किती टोलवाढ केली जाईल याची माहिती आलेली नाही. परंतू दिल्लीपासून तामिळनाडू, केरळपर्यंत टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks