ताज्या बातम्यासामाजिक

बांधकाम कामगार कल्याणकारी असोशिएशन तडशिनहाळ च्या वतीने बांधकाम कामगारांना मोफत मध्यान भोजन सुरु

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोशिएशन तडशिनहाळ च्या वतीने तालुक्यातील बांधकाम कामगारांना मोफत मध्यान भोजन योजना सुरू करण्यात आली. यावेळी अध्यक्ष कल्लापा निवगीरे म्हणाले की आमच्या चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोशिएशन च्या माध्यमातून ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केली आहे अशा बांधकाम कामगारांना शासनाच्या सर्व योजना मिळवून देण्यासाठी आमच्या संघटनेचे पदाधिकारी चांगले काम करीत आहेत.

तालुक्यातील एकमेव अशी संघटना आहे की नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना लवकरात लवकर स्मार्ट कार्ड,अत्यावश्यक सेवा संच,सुरक्षा कीट ह्या सर्व योजना ताबडतोब मिळवून देत आहोत आणि आज पासून तालुक्यातील कामगारांना कामाच्या ठिकाणी मोफत मध्यान भोजन सुरू केल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरणात निर्माण झाले आहे. आता उद्या पासून माणगाव, तडशिनहाळ, शिनोळी, सुरूते, चंदगड, कोवाड, तुडये आशा त्या त्या भागातील कामगारांसाठी ह्या गावातून जेवण दिले जाईल तरी बांधकाम कामगारांनी आप आपल्या भागातील गावातून जेवणचा डबा घेऊन ह्या योजनेचा लाभ घ्यावा तसेच आजूनही तालुक्यातील बरेच बांधकाम कामगार नोंदणी पासून वंचित आहेत त्यांनी आमच्या संघटनेच्या तडशिनहाळ फाटा येथील आँफिसला संपर्क साधून आपली नोंदणी करावी व योजनांचा लाभ घ्यावा.

कमीत कमी वेळा मध्ये बांधकाम कामगारांना शासनाच्या योजना मिळवून देऊन कामगारांच्या विश्वास पात्र ठरलेली चंदगड तालुक्यातील एक मेव संघटना चंदगड तालूका बांधकाम कामगार कल्याणकारी असोशिएशन तडशिनहाळ ह्या कार्यक्रम ला उपाध्यक्ष बाबू चौगले, सचिव मोहन चौगले, खजिनदार उमाजी पवार, सदस्य सटुपा सुतार, अवदुत भुजबळ, शिवाजी पाटील, मारूती पाथरूट, मोनेश्री चव्हाण, रघुनाथ पाटील, गुंडू कडोलकर, नागोजी कांबळे, परसु नरी,सुरेश चिंचंणगी,शिवाजी तरवाळ,विलास कांबळे, संजय कोनेवाडकर,व तालुक्यातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार सटुपा सुतार यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks