काँग्रेसचे आमदार पी. एन.पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दिली प्रतिक्रिया! आम्हा कुटुबीयांना त्रासच द्यायचा असेल तर आता न्यायदेवता आम्हाला न्याय देईल

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
पी. एन.पाटील म्हणाले, राजेश आणि आदिती यांचा आम्ही विवाह थाटात करून दिला होता. आम्ही सर्वजण आनंदात होतो. मात्र, या सगळ्याला आदितीने गालबोट लावले. गेल्या 2 वर्षांपासून त्या आम्हाला त्रास देत आहेत.तसेच त्या आमच्या कुटुंबाशी मनमोकळ्यापणे राहिल्या नाहीत.अलिकडे त्या माहेरीच होत्या. मे महिन्यात आम्हाला नोटीस आली. त्यानंतर मी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना जाऊन भेटलो पण त्यांनीही त्यांच्या भाऊ आणि पुतणीला समजावण्यात असमर्थता दर्शविली. आम्ही आमच्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही आदिती या ऐकण्यास तयार नाहीत. त्यानंतर आम्ही वकिलांना पाठवून समजावून सांगितले. घटस्फोट हवा आहे का? असे विचारले असता त्यांनी त्यालाही नकार दिला. मला केवळ सासरच्या लोकांना त्रास द्यायचा आहे,’ असे आदिती यांनी वकिलांना सांगितले. यावरून त्यांचा हेतू लक्षात येतो. आमच्या परीने प्रयत्न केले आहेत. मात्र, त्यांना आमच्या कुटुबीयांना त्रासच द्यायचा असेल तर आता न्यायदेवता आम्हाला न्याय देईल.
आतापर्यंत इतक्या तरुणांना नोकऱ्या लावल्या पण कुणाकडून अर्धा कप चहा घेतला नाही. त्यामुळे त्यांनी पैसे मागितल्याचा आरोप करणे हे क्लेशदायक आहे.