महापूर व अतिवृष्टीने नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी; भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे तहसिलदारांना निवेदन

कागल प्रतिनिधी :
महापूर व अतिवृष्टीने नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी.या मागणीचे निवेदन
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसिलदार शिल्पा ठोकडे यांना दिले.
निवेदनातील मजकूर असा,
गेल्या आठवड्यामध्ये कागल तालुक्यात अतिवृष्टी व महापुरामुळे प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामध्ये दुधगंगा, वेदगंगा व चिकोत्रा या नद्यांच्या काठा शेजारील क्षेत्रातील ऊस, भात, भुईमुग, सोयाबीन आदी पिके महापुराच्या पाण्याखाली बुडाली आहेत. त्यामुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. अचानक उदभवलेल्या या पुर परिस्थितीमुळे मोटरपंप व मोटरपेठया पाण्यात बुडुन खराब झाल्याने सुद्धा शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
तसेच अनेक घरांमध्ये महापुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड होवून नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन शेतकरी व नागरिकांना त्वरीत नुकसान भरपाई मिळणेबाबत कार्यवाही व्हावी.
यावेळी राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील उपाध्यक्ष नंदू माळकर तालुकाध्यक्ष संजय पाटील शहराध्यक्ष सुशांत कालेकर विवेक कुलकर्णी राजेंद्र जाधव प्रविण गुरव, दीपक मगर ,युवराज पसारे गजानन माने, हिदायत नाईकवाडी सचिन निंबाळकर बाळासाहेब जाधव अरुण गुरव आदि उपस्थित होते.