कापशी खोऱ्यातील लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी कटीबद्ध…!; कासारी येथे शशिकांत खोत यांचे प्रतिपादन

सेनापती कापशी :
कापशी खोऱ्यातील लोकांच्या चांगल्या व सुदृढ आरोग्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यासाठी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कापशी पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत यांनी कासारी येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
कापशी जिल्हा परिषद मतदार संघातील मतदार संघातील 27 गावांमध्ये आरोग्य शिबीर राबविण्याचा मानस असून आतापर्यंत 10 गावांमध्ये आरोग्य शिबिर पूर्ण झाली असून 800 हून अधिक रुग्णांच्या वर मोफत उपचार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या आरोग्य शिबिराचा लाभ सर्व गरजू रुग्णांना घ्यावा असे आवाहन करून कोरोना काळात कापशी कोविड सेंटरच्या माध्यमातून एक आश्वासक आणि उत्कृष्ठ सेवेचे काम झाले असून भविष्यात तिसरी लाट आलीच तर या लाटेचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत असा विश्वास यावेळी शशिकांत खोत यांनी व्यक्त केला.
यावेळी पंचायत समिती सदस्य दीपक सोनार, सरपंच मन्सूर देसाई, उपसरपंच शिवाजी इंगवले, राजेंद्र राजिगरे,विठ्ठल कांबळे गुरुजी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.