ताज्या बातम्यामहाराष्ट्र

रिक्षा भाडेवाडीस मंजुरी !प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस

कोल्हापूर :- रोहन भिऊंगडे

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने सर्व बाबींचा विचार करून हकीम समितीच्या शिफारशीनुसार वाहनाची किंमत, घसारा, कर, विमा, दुरूस्ती देखभाल खर्च, महागाई निर्देशांक, इंधन खर्च या सर्व बाबींचा समावेश करून रिक्षाचे सुरूवातीचे किमान भाडे 20 वरून 22 व पुढील प्रति किमी. भाडे 17 वरून 18 रूपये भाडेवाड करण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.
नवीन दर लागू करण्यासाठी मीटर कॅलिब्रेशन करून घेणे गरजेचे आहे. मीटर कॅलीब्रेशन करण्यासाठी 180 दिवसांची म्हणजेच दि. 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. मीटर कॅलीब्रेशन केलेल्या ऑटोरिक्षाधारकांसाठी नवीन दर 1 मे 2021 पासून लागू होतील. रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत दीडपट भाडे आकारण्यात येईल. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks