ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शालेय पोषण आहार मदतनिशांना वाढीव मानधन न  मिळाल्यास र आंदोलन छेडू : कॉम्रेड भगवान पाटील यांचा इशारा 

सावरवाडी प्रतिनिधी :

कोल्हापूर जिल्ह्यातील शालेय पोषण आहार मदतनिशांना केंद्र शासन ६० टक्के  व राज्य शासनाच्या ४० टक्के  धोरणा नुसार  शालेय पोषण आहार मदतनिशांना वाढीव मानधन मिळावे , जिल्हा परिषदेने कोरोना काळातील थकीत मानधन जिल्हा बँकेकडे वर्ग केले असून त्याचे वितरण जिल्हा बँकेकडून व्यवस्थित झाले नाही त्याची चौकशी करुन मदतनिशांना त्वरीत मिळावे या इतर मागण्या बाबत लाल बावटा शालेय पोषण आहार मदतनिश संघटनातर्फ तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भगवान पाटील ( आमशीकर ) यांनी दिला 
  राधानगरी येथील अंबाबाई मंदीरात झालेल्या तालुकास्तरीय संघटनेच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संजय गुरव होते . मेळाव्यात शालेय पोषण आहार मदतनिशांना बारा महिने मानधन मिळावे .केंद्र व राज्य शासनाच्या ६० – ४० टक्के धोरणानुसार फरका सहीत मानधन आदा करावे . मदतनिशांना शासकिय जॉबकार्ड व नियुक्ती पत्र मिळावित, आदिमागण्याचे ठराव एकमुखी करण्यात आले . 

.                    यावेळी प्रा आर एन पाटील , राधानगरी तालुकाध्यक्ष तानाजी पाटील , प्रतिभा पार्टे, सुरेखा वर्णे, आदिची भाषणे झाली . प्रास्ताविक  सचिव दिनकर पाटील यांनी केले . शेवटी वैष्णवी जाधव यांनी आभार मानले मेळाव्यास पाचशे मदतनिश उपस्थितीत होते . 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks