ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांचे निधन

Team online :

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. 10 ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर कोसळले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली होती. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता त्यांच्या निधनानं मनोरंजन सृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.

मालिका आणि चित्रपटांमध्ये केलं काम

राजू श्रीवास्तव हे त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. या कार्यक्रमामधील त्यांच्या परफॉर्मन्सचं अनेकांनी कौतुक देखील केलं. ‘द किंग ऑफ कॉमेडी’ असंही राजू श्रीवास्तव यांना म्हणलं जातं. तसेच त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

मैंने प्यार किया आणि बाजीगर या चित्रपटांमध्ये राजू श्रीवास्तव यांनी काम केलं. तसेच ‘बिग बॉस 3’, ‘नच बलिए’ आणि ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळते. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील राजू अॅक्टिव्ह असतात.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks