ताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंदगड येथील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

चंदगड : पुंडलिक सुतार

चंदगड येथील युवासेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे चंदगड युवासेनेच्या चार पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे कोल्हापूर जिल्हा युवासेना विस्तारक सतीश नरसिंग यांच्याकडे सादर केले आहेत. त्यामुळे शिवसेना गोटात व संपूर्ण तालुक्यात विविध चर्चेला उत आला आहे राजीनामा पत्रात असे म्हंटले आहे की काही वर्षांपासून सेनेमध्ये आम्ही सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहोत, पण गेल्या काही दिवसापासून आम्हाला सेनेमध्ये सापत्न भावाची वागणूक दिली जातेय. कोणत्याही कार्यक्रमाला बोलावले जात नाही, तसेच तालुका निर्णय प्रक्रियेत आपली दखल घेतली जात नसलेने आम्ही राजीनामे देत आहोत.

शरद गावडे व निलेश पाटील दोघेही चंदगड तालुका युवासेनेचे समनवयक ,आकाश गावडे युवासेना सोशल मीडिया समनवयक,भरमु आपटेकर, युवासेना चिटनिस आदी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks