जीवनमंत्रताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
संविधान दिनानिमित्त समाजकल्याण विभागामार्फत बिंदू चौक येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, तहसीलदार शितल मुळ्ये-भामरे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
“आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य….” या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. संविधान उद्देशिका गीत कबीर नाईकनवरे यांनी तर वाचन सचिन परब केले. यावेळी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन उपस्थित सर्वांनी उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.