अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत भरावा लागणार अर्ज

गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रियेला शनिवारपासून सुरुवात झाली. या प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केले. त्यानुसार अभियांत्रिकी प्रवेशासाठी नोंदणी व अर्ज भरण्यासाठी दि. 4 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापूर्वी राज्य सीईटी सेलने अभियांत्रिकीचे प्रवेश दि. 15 जून रोजी जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे पालकांतून तीव्र नाराजी होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी दि.24 जून रोजी वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे स्पष्ट केले. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये नोंदणी शुल्क असून, आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी 600 रुपये शुल्क आहे.
प्रवेशाचे वेळापत्रक….
अर्ज नोंदणीसाठी मुदत : 24 जून ते 3 जुलै
अर्ज करणे व दाखल करण्यासाठी मुदत : 4 जुलैपर्यंत प्रवेश फेरीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
प्रवेशासाठी अर्ज करण्याचे टप्पे..
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करण्यापूर्वी प्रथम नोंदणी करावी लागेल.नोंदणीनंतर अर्ज करताना दोन पर्याय उपलब्ध असतील.पहिला पर्याय म्हणजे अर्ज केल्यानंतर सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावे लागतील.कागदपत्रांची पडताळणी ऑनलाइनद्वारे होईल, त्यास ई-स्क्रुटीनी म्हणतात.दुसरा पर्याय म्हणजे अर्ज केल्यानंतर सर्व कागदपत्रे व त्याची पडताळणी करण्यासाठी प्रत्यक्ष स्क्रुटीनी सेंटर हा पर्याय आहे. यात लगतच्या स्क्रुटीनी सेंटरमध्ये जाऊन अर्ज पडताळणी करून घ्यावी. राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावरून सर्व माहितीपुस्तिका वाचून अर्ज भरावा.