आदमापूर येथील राणादा विकास फौंडेशन मार्फत बाळुमामा मंदिर व परिसराची स्वच्छता

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आदमापूर ता. भुदरगड येथील राणादा युवा विकास फौंडेशन ने सद्गुरू बाळूमामा मंदिर आदमापूर येथील मंदिर व परिसर तसेच उड्डान पुलाखालील भाग ,मुख्य रस्ता अशा एकूणच परिसरात स्वच्छता मोहिम यशस्वी केली.फौंडेशनचे अध्यक्ष राणादा विकास पाटील यांनी या स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केले.
नव्याने स्थापन झालेल्या या मंडळाने सामाजिक विकास कार्यासाठी जोर लावला असून अत्यंत जागरूपकपणे प्रत्येक गोष्टीत चांगल्या पध्दतीने सेवाभाव जोपासण्याचे कार्य सुरू ठेवले आहे.प्रत्येक आमावस्या व रविवारी काही भाविक भक्तांकडून अनावधानाने कचरा होतो. सद्गुगुरू बाळूमामांच्या दर्शनासाठी विपुल संख्येने भाविक येत राहतात त्यामूळे मंदिर व परिसराची स्वच्छता अत्यंत गरजेची असते.ती वेळेतच व्हावी यासाठी या राणादा युवा फाउंडेशन ने आता कंबर कसली आहे.
या फाऊंडेशनचे सारे कार्यकर्ते झाडून या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.मंदिर व परिसर तसेच उड्डान पुलाखालील परिसर अत्यंत स्वच्छ व निटनेटके झाले. ग्रामस्थ व भाविकांनी या उपक्रमा बद्दल समाधान व्यक्त केले.संस्थापक अध्यक्ष राणादा विकास पाटील यांना स्वच्छता मोहिमेचे निटनेटके संयोजन केले.कमी वेळेत चांगले काम झाल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष विकास पाटील (राणा) यांनी दिली.
यावेळी बाळूमामा देवस्थान मंडळानेही या स्वच्छता मोहिते कौतुक केले.मंडळाचे कार्यकर्ते वैभव कांबळे,संभाजी कांबळे, अवधुत,स्वप्निल, यश कृष्णा खापरे,किरण पाटील,प्रकाश पाटील ,गोऱ्या यांचे मोलाचे सहकार्य लाभलेचे या विकास फौंडेशन चे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले.