ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नागरिकांची कामे वेळेत करावीत : नूतन प्रांत वसुंधरा बारावे

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
तहसीलदार कार्यालयाकडे विविध कागदपत्रासाठी येणाऱ्या नागरिकांची कामे तात्काळ करून त्यांचे हेलपाटे कमी करावेत असे आजरा भूदरगड च्या नूतन प्रांताधिकारी श्रीम वसुंधरा बारावे यांनी आजरा तहसीलदार कार्यालयात सत्कार समारंभात बोलताना व्यक्त केले स्वागत तहसीलदार विकास अहिर यांनी केले प्रास्ताविक नायब तहसीलदार डी डी कोळी यांनी केले यावेळी नूतन प्रांत श्रीम वसुंधरा बारावे यांचा सत्कार तहसीलदार विकास अहिर,नायब तहसीलदार डी डी कोळी ,स पो नि सुनील हारुगडे , निवासी नायब तहसीलदार संजय कांबळे,मंडळ निरीक्षक जि बी पाटील,महसूल सहायक सुजाता काजीरणेकर, सोनाली सुतार,उपलेखपाल सुरेखा शेलार,लता जाधव आदी उपस्थित होते.