गुन्हाताज्या बातम्याभारत

अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, दोघांना अटक; पॉक्सो अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल

बेळगाव प्रतिनिधी :

बेळगाव येथील कॅम्प परिसरातील अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बेळगाव पोलिसांनी रोशन डुकरेज या संशयित आरोपीसह आणखी एकाविरुद्ध पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.

ही घटना आठ दिवसापूर्वी घडलेली होती. मात्र, आपली बदनामी होईल या भीतीने ही घटना लपवून ठेवण्यात आली. पीडित मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, तिची प्रकृती गंभीर बनल्याने बेळगावमधील सिविल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी रोशन हा मुंबईहून काही दिवसापूर्वी बेळगाव येथे नातेवाईकांनकडे आलेला होता. त्याच्यासोबत आणखी एका तरुणाने घरी कोणी नाही याचा फायदा घेत घरात घुसून या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. ही बाब आईच्या लक्षात आली. मात्र, बदनामीच्या भीतीने ही बाब लपवण्यात आली. तसेच या मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार घेतले जात होते. पण मुलीची प्रकृती बिघडल्याने बेळगाव येथील सिविल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर सर्व घटना उघडकीस आल्या.

ही घटना उघडकीस येताच संतप्त नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला आहे. या दोन्ही नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks