ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आजरा येथे कृषी सुविधा कार्यशाळा
आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
आजरा येथे केंद्र पुरस्कृत कृषी पायाभूत सुविधा निधी योजना (AIF) तालुकास्तरीय कार्यशाळा पंचायत समिती सभागृह आजरा येथे संपन्न झाली.या कार्यशाळेत शेतकऱ्यांन दाजी दाईंगडे गटविकास अधिकारी पंचायत समिती आजरा, अनिल फोंडे तालुका कृषी अधिकारी आजरा,इंद्रजित देसाई अध्यक्ष तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समिती आजरा,यांनी मार्गदर्शन केले तर चंद्रकांत त्रिभुवने व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा उत्तूर,अक्षय पोवार अर्थतज्ञ स्मार्ट कोल्हापूर, अशोक मोरे जिल्हा संसाधन व्यक्ती PMFME योजना, व्ही आर दळवी कृषी पर्यवेक्षक व अधिकारी,कर्मचारी आदींसह शेतकरी उपस्थित होते.