ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : नागरदळेत “इच्छा माझी पुरी करा” नाट्यप्रयोग

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
नागरदळे (ता. चंदगड) येथे मंगळवार दि. १५/०३/२०२२ रोजी रात्री १० वाजता अखंड हरीनाम सप्ताह निमित्त संपूर्ण महाराष्ट्र गाजत असलेले वसंत सबनीस लिखित तुफान विनोदी नाटक “इच्छा माझी पुरी करा” नाट्य प्रयोग सादर होणार आहे.
गीता फाटक ग्रुप-कराड पुरस्कृत तीन अंकी धमाल विनोदी तमाशा प्रधान वगनाट्य प्रयोग सादरीकरण होणार असून तमाम रसिक प्रेक्षक व भाविक भक्तांनी या नाट्य प्रयोगाचा लाभ घ्यावा असे अव्हाहन निर्माता एकनाथ पाटील यांनी केले आहे.