ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : ढोलगरवाडी ड्रग्स प्रकरणातील आरोपी राजकुमार यांच्यासह मुबंई पोलिसांचं पथक पुन्हा चंदगड मध्ये दाखल

चंदगड प्रतिनिधी :
ढोलगरवाडी ड्रग्स प्रकरणातील आरोपी राजकुमार राजहंसला घेऊन मुंबई पोलीस पून्हा चंदगडात दाखल झाले आहेत. आरोपींना घेऊन चंदगड मधील काही भागात सर्च ऑपरेशन करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी गावातून 2 कोटी 35 लाख रुपयांच ड्रग्स बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं होतं.या प्रकरणातील आतापर्यंत मास्टरमाईड असणारा वकील राजकुमार राजहंस,केअरटेकर निखिल लोहार आणि मुंबईतील महिला ड्रग्स पेडलर्स ख्रिस्थियाना या तिघांना अटक करण्यात आली होती.यापैकी वकील राजकुमार राजहंस,केअरटेकर निखिल लोहार यांना घेऊन मुबंई अंमली विरोधी पथक आता पुन्हा एकदा चंदगड मध्ये दाखल झाले आहेत.मुंबई पोलिसांच्या चंदगडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या फेरीच्या तपासात महत्वाचे धागेदोरे हाती मिळण्याची शक्यता सूत्रांकडून मिळतेय.