चैतन्य संस्थेचा 33 वा वर्धापन दिन यशस्वी संघ करवीरच्या वतीने उत्साहात साजरा

कौलव प्रतिनिधी : संदीप कलिकते
चैतन्य संस्था राजगुरुनगर,खेड पुणे या संस्थेचा 33 वर्धापन दिन निगवे दु,ता करवीर येथे यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीर अंतर्गत असलेल्या बचत गटाच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संघाच्या पदाधिकारी वंदना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत आणि प्रास्ताविक गौतमी लाड यांनी केले.
चैतन्य संस्थाचा वर्धापन दिन केक कापून करण्यात आला यावेळी अंगणवाडीमधील मुलांना खाऊ आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी संघाच्या अध्यक्षा वैशाली घुणके, पदाधिकारी , संजीवनी गुरव,विमल डोंगळे, सविता शिवशरण, सुषमा पोवार, वैष्णवी मिरजकर, प्रज्ञा देशमुख, रचना भोसले, पूजा नलवडे, संघाच्या व्यवस्थापिका सुजाता कलिकते,कार्यकर्त्यां मनिषा शिंगाडे,शितल कुसाळे, वैशाली कांबळे, अंगणवाडी सेविका यांच्यासह बचत गटातील महिला उपस्थित होत्या, शेवटी आभार अंगणवाडी सेविका माने यांनी मानले.