ताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी च्या योजना घराघरात पोहचवणार : राजे समर्जीतसिंह घाटगे केंद्रीय कृषीमंत्री ना.तोमर याची दिल्ली येथे घेतली भेट

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शेती व्यवसाय आणि शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.केंद्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यासाठी उपयुक्त अनेक योजना आहेत,त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत शाहू ग्रुपच्या माध्यमातून कशा पोहोचतील व त्या प्रभावीपणे कशा राबविता येतील यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी भेट घेतली.

दिल्ली येथील कृषी मंत्रालयातील दालनात केंद्राच्या विविध योजनांसह अनुदानाच्या नियोजनाबाबत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यावर मंत्रीमहोदयांनी सकारात्मकपणे निर्णय घेत असलेची ग्वाही श्री.घाटगे यांना यावेळी दिली
यावेळी कृषिमंत्र्यांचे अतिरिक्त खाजगी सचिव कुलदीप राठोरे, शाहू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, मुख्य शेती अधिकारी रमेश गंगाई उपस्थित होते.

यामध्ये चर्चेमध्ये प्रामुख्याने किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज व अनुदान योजना प्रभावीपणे कशी राबविन्यात येतील,तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत विविध योजना पश्चिम महाराष्ट्रामध्ये राबवण्यास भरपूर वाव आहे. त्याबाबतही केंद्र पातळीवर शेतकऱ्यांना मदत व्हावी अशी विनंती ही त्यांनी केली याचबरोबर राष्ट्रीय फलोद्यान महामंडळा अंतर्गत केंद्र शासनाच्या योजनेमध्ये मोठ्या शेतकऱ्यांचा समावेश केला आहे. या योजनेमध्ये अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना समाविष्ट करून त्यांनाही याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी या योजनेतील काही अटींमध्ये शिथिलता आणणे आवश्यक आहे.प्रामुख्याने जास्त क्षेत्राची असलेले अट कमी करण्याबाबत श्री घाटगे यांनी मंत्री महोदयांना विनंती केली.

तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनी व फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन करीता असणाऱ्या सुविधा शेतकऱ्यांना सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक संस्था व संबंधित विभाग यांना सूचना देण्यात याव्यात अशी आग्रही विनंतीही घाटगे यांनी केली.

याशिवाय सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा संस्थांनी ठिबक सिंचन योजना सामुदायिकपणे राबविल्यास त्यावर भरीव अनुदान देणे बाबत शासन पातळीवर विचार व्हावा. अशीही मागणी करण्यात आली.
विशेष म्हणजे या सर्व योजनांचा लाभ देत असताना पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांशी भाग हा डोंगराळ भाग आहे. या योजना राबवताना डोंगरी भाग म्हणून या भागातील शेतकऱ्यांना सवलत मिळून जास्तीत जास्त प्रमाणात अनुदान मिळण्यासाठी मदत करावी. असेही साकडे श्री घाटगे यांनी घातले.

समर्जीतसिंह घाटगे यांचे अभिनंदन !

या ग्रुप ची पालक संस्था असलेला शाहु सह साखर कारखाना देशात आदर्श आहे.नुकतीच या कारखान्याने राज्यात सर्वप्रथम एकरकमी एफ आर पी देणेचा निर्णय जाहीर केला आहे.याबद्धल श्री घाटगे यांचे श्री तोमर यांनी अभिनंदन केले .यावेळी ना. तोमर याना शाहू कारखान्याच्या भेटीचे निमंत्रण श्री घाटगे यांनी दिले .यावर हम जरूर आएंगे.असे म्हणून निमंत्रनाचा स्वीकार केला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks