ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शिरोली दुमाला येथे पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. गावातील शाळेकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच रेखा कांबळे पिपल्स पार्टीचे संघटक यल्लाप्पा कांबळे, सुभाष कांबळे, विनायक कांबळे, किरण कांबळे, विकास कांबळे, आनंदराव भोपळे, एम. आर. कांबळे आदि मान्यवर उपस्थितीत होते.