ताज्या बातम्यामहाराष्ट्र
भुदरगड तालुक्यातील शेणगांव येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

शेणगांव प्रतिनिधी : योगेश कोळी
शेणगांव येथील आदिवासी कोळी समाज यांच्या वतीने आदिवासी क्रांतिकारी युध्दा बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बिरसा मुंडा यांचा जन्म रांची जिल्ह्यातील उलिहातू गावात 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला होता. ब्रिटीशांविरूद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात बिरसा मुंडाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. हा जननायक मुंडा जातीचा होता.
सध्याच्या भारतात रांची आणि सिंहभूमीचे आदिवासी बिरसा मुंडाला ‘बिरसा भगवान’ म्हणून ओळखतात. आदिवासींवर होत असलेल्या इंग्रजांच्या दडपणाविरूद्ध बिरसा मुंडा यांनी जो लढा लढविला त्यामुळे त्यांना हा मान मिळाला आहे, असे प्रतिपादन कोळी समाज बांधव योगेश कोळी यांनी बोलताना केले.
यावेळी गजानन कोळी, जितेंद्र कोळी, कृष्णात कोळी, वसंत कोळी व महीला उपस्थित होत्या.