ताज्या बातम्याभारतसामाजिक
मुरगूड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती संघाच्या विरंगुळा केंद्रात साजरी करण्यात आली .
प्रारंभी संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले . यावेळी संघाचे सदस्य विनायकराव हावळ यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे तसेच सदस्य श्रीकांत निकम यांच्या लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले .संघाचे संचालक जयवंतराव हावळ यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन व कार्याचा आढावा घेतला . यावेळी सदाशिव एकल, पांडुरंग पाटील, अशोकराव डवरी, महादेवराव वागवेकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते .
संचालक मधुकर सामंत यांनी उपस्थितांचे आभार मानले .